Pimpri: पिंपरीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मंगळवारी भिमगीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे मंगळवारी (दि. 21)आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील पटांगणावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हा महोत्सव होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, डीबीएन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकाळजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

जयंती महोत्सवांतर्गत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.