Pune: शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील शेतकऱ्याला अटक

Pune: Farmer arrested in Daund taluka for farming apheem ननवरेने स्वामी चिंचोलीतील आपल्या शेतात कांदा, मुळा आणि हरभरा या पिकामध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड केली होती.

एमपीसी न्यूज- शेतातील कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड करणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. भीमराव लक्ष्मण ननवरे (वय 53) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

हा शेतकरी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रहिवासी असून त्याला न्यायालयात हजर केले असता आठ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ननवरे याच्याविरोधात दौंड पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार 26 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

आरोपी ननवरेने स्वामी चिंचोलीतील आपल्या शेतात कांदा, मुळा आणि हरभरा या पिकामध्ये आंतरपीक म्हणून अफूची लागवड केली होती. पोलिसांनी त्यांच्या शेतातून ओली व सुकलेली अकरा हजार रुपये किमतीची अफूची झाडे हस्तगत केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like