Talegaon : सास-याची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या जावयाला मारहाण

एमपीसी न्यूज – सास-यांची त्यांच्या भावकीतील लोकांसोबत भांडणे सुरु होती. ही भांडणे सोडविण्यासाठी जावईबापू मध्ये पडले. भावकीच्या वादात पाहुणा पडल्याचे पाहून आरोपींनी सास-यांऐवजी जावायालाच चोप दिला. ही घटना मावळ तालुक्यातील आंढळे गावामध्ये सोमवारी रात्री एकच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

शाम सुरेश गोपाळे (वय 35, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष आबू काटे, हनुमंत आबू काटे (दोघे रा. आढले, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम यांचे सासरे महादू काटे यांचे भांडण सुरु होते. महादू काटे, त्यांचा भाचा गोरख गाडे, चुलत भाऊ गबळू काटे यांची संतोष आणि हनुमंत यांच्या विरोधात घरगुती कारणावरून भांडण सुरु होते. भांडणे सुरु झाल्याचे पाहून महादू यांचे जावई शाम यांनी ती भांडणे सोडविण्यासाठी धाव घेतली. घरच्या भांडणांमध्ये जावई आल्याचे पाहून आरोपींनी जावई शाम यांना जबर चोप दिला. संतोष यांनी हाताने मारहाण केली. तर हनुमंत याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये शाम गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.