Bhosari : भोसरीमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

एमपीसी न्यूज  – भोसरीतील गणेश मंडळानी यावर्षी स्वच्छता, प्लास्टिक बंदी, पौराणिक कथा यावर भर दिला आहे.  लांडेवाडी चौकातील नवमहाराष्ट्र तरुण मित्र मंडळाने आकर्षक अशी विद्युत रोषणाईतील महल केला आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विलास लांडे आहेत. उपाध्यक्ष उदय लांडे व सचिन लांडगे, कार्याध्यक्ष सुधीर लांडे व मयुर लांडगे, अभिजीत लांडे, रोहित लांडगे, ओमकार लांडे, श्रीकांत गवळी, सौरभ लांडगे, वैभव वसंत चौगुले, नागेश अनसरवाडे, अभिषेक लांडे, गणेश फुलारी, नयन पवार आदी मंडळाचे सदस्य आहेत. मंडळाचे हे 60 वे वर्ष आहे.

लांडगे आळीमधील भोजेश्वर मित्र मंडळाने एक पाऊल निरोगी आरोग्यासाठी हा 7 हलत्या मूर्त्यांचा देखावा उभारला आहे. या देखाव्यातून स्वच्छतेचा संदेश दिला. मंडळाचे 42 वे वर्ष असून अध्यक्ष शंकर लोंढे आहेत. तर सागर भुजबळ हे कार्याध्यक्ष, इलाई शेख हे उपाध्यक्ष, किरण लोंढे हे सचिव आहे. मंडळाच्यावतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

श्रीराम मित्र मंडळाने खंडोबाचा महिमा हा 18 हलत्या मूर्त्यांच्या साहाय्याने देखावा साकारला आहे. मंडळाचे हे 34 वे वर्ष असून अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, उपाध्यक्ष भानुदास लांडगे, कार्याध्यक्ष मयुर लांडे, सचिव बाळासाहेब लांडगे आहेत. तर माळी आळी मित्र मंडळाने कबंध राक्षसाचा उध्दार हा 6 हलत्या मूर्त्यांच्या साहाय्याने देखावा उभारला आहे. मंडळाचे उमेश लोंढे हे अध्यक्ष आहेत. तर मंडळाचे हे 29 वे वर्ष आहे. मंडळामध्ये महेश लोंढे हे उपाध्यक्ष तर कार्याध्यक्ष संजय दाते, सचिव किरण भुजबळ आदी उपस्थित होते. लोंढे  तालीम  मित्र मंडळाने ज्वालासुराचा जन्म  आणि  मृत्यू हा 8 हलत्या मूर्त्यांच्या साहाय्याने देखावा साकारला आहे. मंडळाचे हे 20  वे  वर्ष  असून  आदेश  लोखंडे  हे  मंडळाचे  अध्यक्ष आहेत. शेखर जाधव हे उपाध्यक्ष, अक्षय लोंढे  हे कार्याध्यक्ष तर राजू बो़डके हे सचिव आहेत.

लांडगे लिंबाची तालीम  मित्र  मंडळाने  शिवराज्यभिषेक हा 23 मूर्त्यांच्या  साहाय्याने  हलता  देखावा  केला  आहे. मंडळाचे  हे  65 वे वर्ष असून  मंडळाचे  आधारस्तंभ  नगरसेवक  अॅड.  नितीन लांडगे असून  मंडळाचे संतोष लांडगे हे अध्यक्ष आहेत. तर विनय  लांडगे  हे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तुषार लांडगे, सचिव दिपक लांडगे आहे.

पठारे तालीम व्यायाम मित्र मंडळाने बाबा अमरनाथ कथा हा 10 हलत्या मूर्त्यांच्या साहाय्याने देखावा केला आहे. मंडळाचे अध्यक्ष अशोक पठारे आहेत. तर 61 वे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष अशोक पठारे आहेत. उत्सवप्रमुख आमदार महेश लांडगे  आहेत.  मंडळाचे उपाध्यक्ष  बाळासाहेब  पवळे हे असून सचिव सचिन  लांडगे आहेत. भोसरीतील शिवतेज नगर येथील  शिवज्योत मित्र मंडळाच्या वतीने  मयूर रथातील गणेश हा देखावा केला आहे. मंडळाचे अध्यक्ष शुभम बांबल असून उपाध्यक्ष प्रवीण नाईकडे आहेत. तर सचिव विशाल सानप, कार्याध्यक्ष लक्ष्मण जाधवर,संदेश साकोरे, सागर गोमे, मयुर खोगरे, नितीन भुशेट्टी, केतन घाडगे, अक्षय  फुगे, गणेश आदक, मयुर धनगरमाळी, राहूल कुंटे, राहुल धनगरमाळी  आदी  कार्यकर्ते आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.