Digital Education : साळुंब्रे येथे ग्रामस्थांनी गिरवले अर्थिक व डिजिटल साक्षरतेचे धडे

एमपीसी न्यूज – नाबार्ड व  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोमाटणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने व साळुब्रें ग्रामस्थांच्या सहकार्याने आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये  ग्रामस्थांना बँक आपल्या दारी  या उपक्रमाअंतर्गत 109 जणांची खाते उघडून घेण्यात आली.तसेच बँकेच्या विविध योजनांची माहिती यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली.

या मेळाव्यास पीडीसीसी बँकेचे मावळ विभागाचे विभागीय अधिकारी  जी.बी खांदवे, विकास अधिकारी  आर. के. आहेर, जिल्हा बँकेच्या सिनिअर अधिकारी व सोमाटणे शाखेच्या शाखाधिकारी एल. जी. देसाई, साक्षरता आभियानच्या मावळ तालुका समन्वयक अधिकारी रश्मी घारे, पीडीसीसी बँकेचे सेवक,ए. के. तुरुकमारे, बाळासाहेब घारे पाटील, नेञा घोजगे, साळुब्रेंच्या सरपंच उज्वला आगळे, पोलीस पाटील आरती भंडलकर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक राक्षे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश राक्षे, साळुब्रें विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव व राष्ट्रपती पदक विजेते सरपंच धनंजय विधाटे, सचिव  बन्सी राक्षे, चेअरमन मोतीराम राक्षे, ग्रामपंचायत सदस्य संतोष राक्षे,कैलास यादव,ग्रामपंचायत सदस्य सीमा राक्षे  सुहास विधाटे, समीर राक्षे, राहुल विधाटे, संतोष राक्षे, राजु राक्षे, राहुल राक्षे, कमलेश राक्षे व एकता प्रतिष्ठान डोणेचे कार्याध्यक्ष विशाल कारके उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांना बँकेच्या अनेक कर्ज योजना, मोबाईल बँकिग कशी असते, तिचा फायदा काय होतो, एटीएम कसे वापरायचे, त्याची गोपनियता कशी सांभाळायची आदी बाबतची माहिती देण्यात आली. तसेच ग्रामंस्थांच्याही शंकाचे निरसन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.