Pashan Lake : अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात फिरण्या-बसण्यास मनाई

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील पाषाण परिसरात असणाऱ्या पाषाण तलावावर आता अविवाहित जोडताना जाता येणार नाही.पालिकेच्या उद्यान विभागानेच असा एक निर्णय घेतला आहे.पाषाण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्या-बसण्यावर बंदी घातलेली आहे.सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पाषाण परिसरात असणाऱ्या तलावाच्या संवर्धनासाठी पुणे शहरातील विविध पर्यावरण प्रेमी संघटना आणि पुणे महापालिकेतर्फे विविध प्रयत्न केले जातात. या तलावाच्या परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष आहेत.या वृक्षावर वेगवेगळ्या जातीचे अनेक पक्षी वास्तव्यास आहेत.पक्षी निरीक्षणाची आवड असणारे अनेक नागरिक या तलावाच्या परिसरात फिरतात.याच ठिकाणी प्रेमी युगुल फिरण्यासाठी येतात, पण त्यांच्यामुळे पक्षी निरीक्षणामध्ये अडथळे येत आहेत.

दरम्यान पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांनी याची तक्रार महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली होती.त्यानंतर महापालिका प्रशासनाने ही लगेच तत्परता दाखवत अविवाहित जोडप्यांवर या ठिकाणी येण्यास मज्जाव केला आहे.मात्र, पाषाण तलाव परिसरात येणारे विवाहित जोडपे, अविवाहित जोडपे कोणते, प्रेमी युगुल, भाऊ-बहिण यातील फरक महापालिकेचे सुरक्षारक्षक व कर्मचारी कसे ओळखणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.