Crime News : आई रागावल्याने अल्पवयीन मुलीचं टोकाचे पाऊल, पुणे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज – आई रागावल्याने एका अल्पवयीन मुलीने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. सोळा वर्ष वय असलेल्या या मुलीने दौंड – मनमाड लोहमार्ग रेल्वे पुलाजवळील नदीपात्राच्या कठड्यावरून दुपारच्या सुमारास भीमा नदीपात्रात उडी मारली.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

 

यासंदर्भात मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ही मुलगी सापडली नाही. भीमा नदीपात्रात वाढलेले पाणी आणि पाण्याचा वाढता प्रभाव पाहता ही मुलगी वाहत दौंडपासून काही अंतरावर पुढे गेली.दरम्यान, आज दुपारी या मुलीचा मृतदेह अनगर (ता.श्रीगोंदा) या गावाच्या हद्दीत नदीकाठी सापडला.यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.