Crime News : दुचाकी चोराला शिवाजीनगर पोलिसांकडून बेड्या

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.या कारवाईत पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणत तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

रवी दशरथ वाकोडे (वय 38 रा. संगमवाडी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार भिवरे यांना बातमी मिळाली की, मंगला टॉकीजच्यामागे निळ्या रंगाचा शर्ट घातलेली एक व्यक्ती संशयीतरित्या दुचाकीवरून फिरत आहे.त्यानुसार पोलीस तेथे गेले असता आरोपी तेथून पळून जात होता.  पोलिसांनी त्याला पाठलाग करत पकडले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली.

तो चालवत असलेल्या गाडी नंबर व कागदपत्रांची माहिती विचारली असता त्याने गाडी चोरल्याचे कबूल केले. पुढील पोलीस तपासात त्याने चोरलेल्या 75 हजार रुपयांच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून त्याचावरील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन तर फरासखाना पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे यावेळी उघड करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.