Vadgaon News : शेती विकास सोसाट्यांच्या सचिवांची वेतन वाढ होणार: सुनिल चांदेरे यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – शेती विकास सोसाट्यांच्या सचिवांची वेतन वाढ अनेक वर्षांपासून रखडलेली आहे.याबाबत लेखी सविस्तर निवेदन  दिल्यास त्याचा बॅंक संचालक मंडळ सहानुभूतीने विचार करेल, असे आश्वासन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांनी दिले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कर्मचारी आणि सहकारी संस्था कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यनारायणाची महापूजा वडगाव मावळ शाखेत आयोजित करण्यात आली होती. यासाठी बॅंक उपाध्यक्ष सुनील चांदेरे वडगाव मावळ येथे आले होते. त्यांनी यावेळी सहकारी संस्था सचिवांची बैठक घेतली. त्यात सचिवांनी  आमचे वेतन अनेक वर्षे वाढविण्यात आलेले नसल्याचे सांगत त्यात वाढ करण्याची मागणी केली.

यावर सचिवांनी याबाबत सविस्तर निवेदन द्या, बॅंक संचालक मंडळ यावर सकारात्मक विचार  करेल असे चांदेकर यांनी आश्वासन दिले.

या वेळी  बॅंक संचालक माऊली दाभाडे यांच्या हस्ते उपाध्यक्ष चांदेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बँकेचे विभागप्रमुख गुलाब खांदवे, मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, सचिव संजय ढोरे, धर्मा ठोंबरे सुरेश कालेकर, धनंजय विधाटे यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.