Nigdi : जागृती अंधशाळेला लायन्स क्लब ऑफ पूनाची आर्थिक मदत

एमपीसी न्यूज –  मरकळ येथील जागृती मुलींच्या अंधशाळेला लायन्स क्लब ऑफ पूना निगडीने प्रांतपाल एम जे एफला रमेश शहा यांच्या हस्ते संगीत वाद्यासह आदी साहित्य शाळेचे मानद अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्याकडे सुपूर्त केले. तसेच 25 हजार रूपये मदतीचा धनादेशही यावेळी त्यांच्याकडे देण्यात आला.

ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करत याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे होते. याप्रसंगी ला. प्रशांत व मंजिरी कुलकर्णी, ला. दिलीपसिंह व मीना मोहिते, ला. संजय व सविता निंबाळकर, ला. जयश्री मांडे, ला अजय देशपांडे, ला. चंद्रशेखर पवार, ला मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एम जे एफ ला हेमंत नाईक यांनी मुख्याध्यापिका वानखेडे यांच्याकडे क्राफ्ट पेपर दिले. जागृती शाळेच्या वतीने अंध मुलींना गेल्या 14 वर्षांपासून शिक्षण दिले जाते. ला रमेश शहा यांनी अखंडित सेवेचे कौतुक केले व प्रांताकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. ही अखंडित सेवा एम जे एफ ला. अशोक व ला. उषा येवले परिवाराकडून चालू आहे.

दरम्यान, ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या वतीने रक्तदान शिबीर, निगडी येथील वाहतुक विभागातील पोलिसांना डोळ्यात टाकण्याचे पंचगव्यनिर्मित आयुर्वेदिक औषधाचे मोफत वाटप, निगडी परिसरातील मंदिरात डस्टबीनचे वाटप, शाहूनगर येथील उद्यानात 100 रोपांची लागवड आदी कार्यक्रम घेण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like