Fire crackers : 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके उडविण्यास मनाई

एमपीसी न्यूज : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात (Fire crackers)  24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते 23 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणारे फटाके उडविण्यास रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे.

या कालावधीत 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि 125 डेसीबल पेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडविण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. (Fire crackers) कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून 50 फुटाच्या आत कोणतेही फटाके स्वैरपणे उडविणे किंवा दारु काम सोडणे किंवा फेकणे अगर आगी फुगे (फायर बलून) किंवा अग्नीबाण सोडणे, उडविणे असे कृत्य करणे, एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन विक्री व वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.

Vadgaon-Maval – स्वीकृत नगरसेवकपदी शंकर भोंडवे 

साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे (Fire crackers) 110, 115 व 125 डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये. या आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 131 प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.