Vadgaon-Maval – स्वीकृत नगरसेवकपदी शंकर भोंडवे 

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे शंकर नंदकुमार भोंडवे यांची निवड करण्यात आली आहे. (Vadgaon-Maval) भाजपाचे स्विकृत नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी पक्षातर्गंत ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणुक घेण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडे शंकर भोंडवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता पिठासिन अधिकारी तथा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ढोरे यांनी शंकर भोंडवे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे, उपनगराध्य राजेंद्र कुडे, नगरसेवक किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण,सुनिता भिलारे, दिपाली मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपाचेअध्यक्ष अनंता कुडे,भाजपाचे तालुका कोशाध्यक्ष सुधाकर ढोरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल घारे,भाऊसाहेब ढोरे, माजी नगरसेवक ॲड विजय जाधव, भुषण मुथा, (Vadgaon-Maval) प्रसाद पिंगळे,शामराव ढोरे,रविंद्र काकडे,श्रीधर चव्हाण, महीला भाजपाच्या तालुका सरचिटणीस वैशाली ढोरे, वडगाव शहर भाजपा महिलाध्यक्षा धनश्री भोंडवे,भरत म्हाळसकर,नारायण ढोरे  सोमनाथ काळे,युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,किरण भिलारे,खंडु भिलारे,पंढरीनाथ भिलारे, संपत म्हाळसकर,नंदु चव्हाण,मकरंद बवरे, नाथा घुले,कल्पेश भोंडवे आदी   उपस्थित होते.

Agrawal samaj : अग्रवाल सम्मेलनचे डिसेंबर मध्ये महाअधिवेशन

निवडीनतंर वडगाव शहरात विजयी मिरवणुक काढण्यात या प्रसंगी मावळभाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी  वडगाव शहरातील आतापर्यंतचे भाजपातील निष्ठावंत (Vadgaon-Maval) व क्रियाशील,पक्षासाठी योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येत असुन येणाऱ्या उर्वरीत काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असुन कार्यकर्त्यांनी आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.