Deadbody found : कोंढवा परिसरातील नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह अढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज : कोंढवा, महंमदवाडी, अर्चना परॅडाईज जवळ नाल्यामध्ये (ओढा) एका इसमाचा मृतदेह असल्याची वर्दी सकाळी 8.21 वाजता अग्निशमन दलास मिळाली असता (Deadbody found) कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी सदर मृत इसमास पाण्याबाहेर काढून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता एक इसम ओढ्यामध्ये असल्याचे निदर्शनास आले. जवानांनी सदर मृत इसमास पाण्याबाहेर काढून उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Vadgaon-Maval – स्वीकृत नगरसेवकपदी शंकर भोंडवे 

या कामगिरीत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांचे वाहनचालक योगेश जगताप व फायरमन तेजस खरीवले, अभिजित थळकर आणि मदतनीस अक्षय चव्हाण,( Deadbody found) अभिषेक कसबे, सतीश अरगडे यानी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.