Nashik phata news: उद्या शनिवार ऑक्टोबर 22 पासून नाशिक फाटा मार्गे खडकीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस व अवजड वाहनांना जाण्यास प्रवेश बंदी

एम पी सी न्यूज : उद्या पासून नाशिक फाटा मार्गे खडकी कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस व अवजड वाहनांना जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आले आहे. ही बंदी सायंकाळी 6 वा. ते रात्री 9 वा. पर्यंत असेल. याबाबतचे आदेश आनंद भोईटे, पोलीस उप- आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर यांनी दिले आहेत.
ट्रॅव्हल्स बसेस व अवजड वाहनांना बंदीचे कारण :
ट्रॅव्हल्स बसेस हे नाशिक फाटा इथून फुगेवाडी, हॅरीस ब्रिज मार्गे खडकी पुणे येथे जातात त्यामुळे खडकी रेल्वे ट्रॅक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फ्लो हा हरीश ब्रिज पर्यंत येत असतो.

नाशिक फाटा मार्गे खडकी कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस व अवजड वाहनांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे
पर्यायी रस्ता
1) नाशिक फाटा येथे डावीकडे वळून सीआयआरटी गेट येथून यु टर्न घेऊन नाशिक फाटा उड्डाणपुल मार्गे म्हसोबा चौक- कोकणे चौक- जगताप डेरी चौकाकडून डावीकडे वळून औंध रोडने इच्छित स्थळी जातील.
2) नाशिक फाटा येथे डावीकडे वळून भोसरी उड्डाणपुलावरून जय गणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ चौक) येथून उजवीकडे वळून अलंकापुरम सोसायटी पुढे तापकीर चौकातून उजवीकडे वळून दिघी विश्रांतवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.