Chinchwad : रबर प्लास्टिक कच-याला आग

एमपीसी न्यूज – बर्ड व्हॅली समोरच्या खुल्या मैदानात टाकलेल्या रबर प्लास्टिक कचऱ्याला आग लागली. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री सातच्या सुमारास घडली. आग मैदानात लागली असल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, रबर प्लास्टिकच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरले होते. 

बर्ड व्हॅली समोरच्या खुल्या मैदानावर टाकलेल्या रबर प्लास्टिक कच-याला शनिवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञात इसमांनी आग लावली. आग मोठ्या स्वरूपात लागल्याने धुराचे लोट हवेत पसरले. तसेच आसपासच्या परिसरात धूर पसरला. यावरून स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी झाला. काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविण्यात आली.

मोकळ्या मैदानात आग लागल्याने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अशोक कानडे, मयूर कुंभार, विनेश वाटकरे, प्रतीक कांबळे, अमोल चिपळूणकर, अमोल खंदारे यांच्या पथकाने आग विझविण्याचे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.