Arvind Sawant : आधी पटक देंगे म्हंटल आणि नंतर अमित शाह मातोश्रीवरच आले : शिवसेनेचा पलटवार

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उध्दव ठाकरे आणि शिवसेनेबद्दलच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. भाजपच्या मिशन मुंबईवर अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. भाजपचं सगळं तसंच असत, त्यांच नुसतं मिशन असत, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरे मिशन. त्यामुळे ते मूळ प्रश्नापासून दूर असतात. जनतेच्या प्रश्नांपासून ते दूर असतात असे म्हणंत मुंबई महापालिकेवरीस शिवसेनेचा भगवा कोणीही काढू शकत नाहीत, असे अरविंद सावंत म्हणाले.

मुंबईत विविध जाती,धर्म, पंथाची माणसे शांततेने राहतात. दुष्काळ असला तरी मुंबई शहराला पाणी मिळतं याचा कुणी विचार केला का. अप्पर वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलं आहे. ते धरण मुंबई महापालिकेच्या पैशातून बांधण्यात आले. उद्दव ठाकरे यांच्या दूरदृष्टीमुळे हे झालं. त्यावेळी राज्य सरकार वेगळं होते आणि केंद्र सरकार वेगळं होते. त्यांनी निधी दिला नाही. पण मुंबई महापालिकेने पैसे खर्च केले. दुष्काळी स्थिती असली तरी मुंबईकरांना पाणी मिळत त्याला कारण शिवसेना आहे, असे सावंत म्हणाले.

शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे नाते अतूट आहे कुणी किती वल्गना करु द्या पंजाव, बंगाल, दिल्लीत जे भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सुज्ञ आहेत. अमित शहा त्यावेळी हरियानाला का गेले होते. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता तुम्ही शब्द दिल्याचे उध्दव ठाकरे सांगत होते.त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेलात. सहा महिन्यानंतर सांगता ते गझनी सारखं असतं, असे सावंत म्हणाले. पटक देंगे म्हंटल्यानंतर मातोश्रीवर का आला होता, असा सवाल आरविंद सावंत यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.