Mulshi : मुळशी धरणातून सायंकाळी पाचपासून 8500 क्युसेक्स विसर्ग

हवामान खात्याचा पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – मुळशी धरण परिसरात गेल्या तासात 54 मिमी पाऊस झाला असून अतिवृष्टीमुळे धरणातून आज सायंकाळी पाच वाजल्यापासून आठ हजार 500 क्यसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

हवामान खात्याकडून पूढील ७२ तासात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. त्यामुळे सुरक्षीततेच्या कारणास्तव पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.