Chakan News: खेड पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी केंदळे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  खेड तालुक्यातील शिंदे गावचे रहिवासी, खेड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य व भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष तानाजी मारूती केंदळे (वय 68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, पाच भाऊ, तीन बहिणी, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

उद्योजक विजय केंदळे यांचे ते वडील, प्राध्यापक बाळासाहेब केंदळे यांचे ते बंधू तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक उत्तम केंदळे यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.