Shivajirao Adhalrao Patil: “कोणीही या, आडवं करायला तयार”, आढळरावांचे प्रत्युत्तर 

एमपीसी न्यूज: शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिरलेकर यांनी गुरुवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आढळराव पाटील यांच्यामुळेच शिरूर मतदार संघात शिवसेना कशी वाढली नाही याचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता. (Shivajirao Adhalrao Patil)  कुठूनही उभे राहावं त्यांना काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील दिला होता. त्यानंतर आता आढळराव पाटील यांनी मिरलेकर यांना प्रत्युत्तर दिले. कोणीही या आडवं करायला तयार असल्याचं सांगत त्यांनी एक प्रकारे निर्णय प्रतिआव्हानच दिले. 

 

आढळराव पाटील म्हणाले पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे वाटोळं झालं त्याला एकमेव रवींद्र मिर्लेकर कारणीभूत आहेत. मीच कट्टर शिवसैनिक आहे सर्व काही मलाच माहित आहे असा आव ते आणत असतात. तुम्हाला नम्रपणे सांगतो मला पाडण्याच्या भाषा करू नका. खासदारकीचे तिकीट पाहिजे म्हणून मी शिंदे गटात सामील झालो नाही. कदाचित मी निवडणूक लढवेन किंवा लढवणारही नाही. (Shivajirao Adhalrao Patil) पण निवडणूक लढवली तर कोणालाही घेऊन या त्याला आडवं करायला मी तयार आहे. आज पर्यंत भलेभले येऊन गेले. आधी तुम्ही कुठून तरी निवडणूक लढवा आणि नंतर आमच्याशी स्पर्धा करा. हिम्मत असेल तर माझ्यासमोर उभे राहून दाखवा असा इशाराही आढळराव पाटील यांनी यावेळी त्यांना दिलाय.

Dr. Kalyan Gangwal : द्रौपदी मुर्मूनी शपथग्रहण सोहळ्यावेळीचे स्नेहभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण गंगवाल

खासदार आढळराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलाय. यानंतर शिरूर मतदार संघात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली आहे. आढळराव पाटील यांच्यावर आता टीका केली जात आहे. आणि त्याच टीकेला आढळराव पाटील यांनी अशाप्रकारे प्रत्युत्तर दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.