PMC News: पुणे महापालिकेची ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलै रोजी

एमपीसी न्यूज: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला. तसेच एक दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.(PMC News)  त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण काढण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 29 जुलै रोजी पुणे महापालिकेसह राज्यातील 13 महापालिका निवडणुकांसाठी सोडत काढली जाणार आहे. 

 

पुणे महानगरपालिकेत ओबीसींच्या 47 जागा असणार आहेत. (PMC News) महापालिकेत एकूण 173 नगरसेवक आहेत. त्यातील 47 जागा या ओबीसीसाठी राखीव असतील. त्यातील 24 जागांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे.

Ranjangaon : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 10 लाखाची चोरी करणाऱ्या आरोपींना केली अटक

असा आहे सोडतीचा कार्यक्रम
26 जुलै रोजी या प्रकरणाची जाहिरात दिली जाईल.
29 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल
30 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी आरक्षणावर प्रभाग निहाय हरकती मागवल्या जातील
5 ऑगस्ट रोजी हरकती सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.