Chikhali : पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार करणाऱ्या चौघांना अटक

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Pimpri : ‘पुणे तेथे काय उणे, दररोज घडतात गुन्हे’!

मंगेश युवराज कदम (वय 21, रा. लांडगेवस्ती, भोसरी), अनिकेत उर्फ अनिल कैलास कदम (वय 23, रा. लांडगेवस्ती, भोसरी), समीर महंमद रफिक इनामदार (वय 22, रा. कात्रज, पुणे), अभिजित धनाजी खाडे (वय 21, रा. भगतवस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनीमधून दोन लाख 16 हजारांचे साहित्य चोरीला गेल्याबाबत चिखली (Chikhali ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रूपनवर यांना माहिती मिळाली की, कंपनीतील चोरलेला माल घेऊन चौघेजण जाधववाडी येथे थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी जाधववाडी राम मंदिर परिसरात सापळा लाऊन चौघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कुदळवाडी येथील एका कंपनीत चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एक रिक्षा, रिक्षामध्ये महिंद्रा कंपनीचे गेअरचे १४४ जॉब, दोन दुचाकी, मोबाईल फोन, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड असा पाच लाख 33 हजारांचा ऐवज मिळून आला.

त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि कागदपत्रांबाबत पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी कुदळवाडी येथे एका व्यक्तीला पोलीस असल्याचे सांगून दमदाटी करून ते चोरी केल्याचे उघड झाले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघड झाला आहे.

आरोपी समीर इनामदार याच्या विरोधात राजगुरूनगर पोलीस ठाण्यात सन 2016 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामिनावर सुटून आला आहे. तर आरोपी मंगेश कदम याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात या वर्षी घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो देखील जामिनावर आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.