Wakad Crime News : सव्वा पाच कोटी रूपयांची फसवणूक प्रकरणी भागीदारांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यवसायात सव्वा पाच कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भागीदारांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊंट वर्ट, वाकड येथे 04 डिसेंबर 2019 ते 28 मार्च 2022 या कालावधीत ही घटना घडली.

जयंत वल्लभदास कनेरिया (रा. माऊंट वर्ट मार्क, पाषाण सुस रोड, पाषाण), धीरजलाल रोरधनदास हंसालिया (रा. बाणेर रोड, बाणेर), अजय बिपिनचंद्र जव्हेरी (रा. बाणेर) आणि धरती अजय जव्हेरी (रा. बाणेर) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडुरंग कलाटे (वय 42, रा. माऊंट वर्ट, वाकड) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कलाटे आणि आरोपी संजय कनेरिया व धीरजलाल हंसालिया हे सर्व माऊंट वर्ट या बांधकाम व्यवसायात भागिदार आहेत. आरोपी कनेरिया व हंसालिया यांनी आरोपी अजय जव्हेरी आणि धरती जव्हेरी यांच्याशी संगणमत करून 16 फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार केली. कागदपत्रावर फिर्यादी भागिदार संजय कलाटे यांची सही न घेता फ्लॅट 10 कोटी 55 लाख रूपयांना अजय जव्हेरी आणि धरती जव्हेरी यांना विकले. फ्लॅटचे पैसे फर्मच्या नावे न त्यापैकी फक्त 6 कोटी 32 लाख 44 हजार 250 रूपये जमा केले व उर्वरित 4 कोटी 22 लाख 55 हजार 750 रूपयांचा आरोपींनी अपहार केला.

सदनिका विकत घेतलेल्या आरोपींनी त्या त्रयस्थ माणसाला 1 कोटी 02 लाख 70 हजार रूपयांना विकून बेकायदेशीर नफा कमावला. आरोपींनी स्वत:च्या स्वार्थासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादी यांची 5 कोटी 25 लाख 25 हजार 750 रूपयांची फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.