Pune : राऊतवाडी येथे रविवारी मोफत आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – स्व. मनोज अरूण राऊत यांच्या व्दितीय स्मृतीदिनानिमित्त ‘आप्पा फांऊडेशन’ च्या वतीने, रविवारी (दि. 1 मार्च) राऊतवाडी (शिक्रापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रमुख सोमनाथ राऊत यांनी दिली.

राऊवाडी येथील सावतामाळी मंदिरासमोर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न होणार आहे. शिबिरात सर्व आजारांवर मोफत तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर सांधेदुखी, मणके विकार आणि हाडांची ठिसूळता तपासणी, महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व रक्त वाढीच्या औषधांचे वाटपही होणार आहे. तसेच डोळ्यांची सर्वसधारण व मोतीबिंदू तपासणीसह दंत चिकित्सा होणार आहे.

गतवर्षी या आरोग्य शिबिरात राऊतवाडीसह वाबळेवाडी, शिक्रापूर व परिसरातील ३५३ नागरिकांनी सहभाग नोंदविला़. यापैकी ५५ जणांना मोफत चष्मावाटप शिबिरच्या वेळेतच करण्यात आले. मोतीबिंदू तपासणीत आढळून आलेल्या १६ मोतीबिंदू रूग्णांपैकी, १२ रूग्णांवर दुस-या दिवशी फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधराणी हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

शिबिरात डॉ. खराडे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल (अहमदनगर), आरोग्य भारती संस्था पुणे, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नामवंत हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.