Pune : इंदिरा आरोग्य सेवेचे 150 वे शिबीर पूर्ण; 12 वर्षांपासून मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम अद्यापही सुरुच

एमपीसी न्यूज – प्रताप गोगावले आणि परिवाराच्या वतीने घेण्यात येणारे इंदिरा आरोग्य मोफत सेवेचे 150 वे शिबीर नुकतेच पार पडले. मागील 12 वर्षांपासून हा मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम नियमितपणे सुरु आहे. ज्या गरजू नागरिकांना वैद्यकीय सेवेचा आर्थिक भार पेलवत नाही, अशा नागरिकांना या शिबिरांतर्गत मदत करण्यात येत आहे.

इंदिरा मोफत आरोग्य सेवेसाठी जनरल ओपीडी डॉ. गौरव सोमाणी, डॉ. दीपक गुजर, होमियोपॅथीक डॉ. सचिन मेहता,डॉ. मृणाल सोलंकी,डॉ. दीपिका गांधी, त्वचा रोग तज्ञ डॉ. सारिका साखळकर, डॉ. जाधव, दंत विभाग डॉ. दीपक सोनार, डॉ. मोरे, अस्थिरोग तज्ञ डॉ. शेखर माळवे, लहान मुलांचे डॉ. सूर्यकांत घुगरी, स्त्री रोग तज्ञ डॉ.अमित संकपाळ आदी डॉक्टर सेवा देतात.

प्रताप गोगावले म्हणाले, “सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा परवडत नाहीत. काहींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते हा भार पेलू शकत नाहीत. अशा सर्व लोकांसाठी इंदिरा आरोग्य मोफत सेवा शिबिरामध्ये मध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. तसेच मोफत औषधे देखील दिली जातात. औषधे आणि श्री स्वामी समर्थ यांची कृपा या दोन्हींचा रुग्णांना फायदा होतो. स्वामींच्या कृपेची प्रचिती प्रत्येक रुग्णाला येते.

इंदिरा आरोग्य मोफत सेवा शिबीर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी 49 मंगळवार पेठ येथील ‘श्री स्वामी समर्थ गोगावले मठ (श्री स्वामी प्रासाद बिल्डिंग’)मध्ये होते. या शिबिरामध्ये जनरल ओपीडी, होमिओपॅथिक, त्वचारोग, हाडांचे रोग, स्त्री रोग, लहान मुलांचे आजार अशा सर्व प्रकारची तपासणी व उपचार केले जातात. प्रताप गोगावले आणि परिवाराने आजवर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

या सर्व उपक्रमांमध्ये मठातील सेवेकरी सदोदित कार्यतत्पर राहतात. श्रीधर गोगावले, अमित संकपाळ, राहुल पाटोळे, उज्वल पोकर्णा, श्रीकांत चिंचवडे, प्रणव स्वामी, कुलदिप गोंडाळ, विशाल घेवडे (फार्मासिस्ट), श्रीकांत डाळ्या, अपर्णा पोतदार, सुयोग पोतदार, शैलेश जगताप, दत्ता वालगुडे,राकेश बजाज आदी सेवेकरी सदैव सेवेसाठी तत्पर असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.