सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Ganesh Utsav 2020 : पुण्याच्या महापौरांनी घरीच केले गणरायाचे विसर्जन

एमपीसी न्यूज – पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे. मोहोळ यांनी पुणेकरांना ‘घरच्या बाप्पाचं घरीच विसर्जन’ करण्याचे आवाहन केलं आहे. त्याच अनुषंगाने महापौर मोहोळ यांनी गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन केले.

घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे लोकेशनही क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुणेकरांना समजण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे 90  टक्के विसर्जन घरच्या घरी झाले होते. हा कल गृहीत धरून फिरत्या हौदांचे नियोजन करण्यात येत आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत पुणेकरांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला असून आपल्या घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती दिली आहे.

गेल्या वर्षी दीड दिवसांच्या 13 हजार 585, पाचव्या दिवशी 25 हजार 896, सातव्या दिवशी 29  हजार 997 आणि शेवटच्या दिवशी 3 लाख 55  हजार 154  गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले होते.

यावेळी शेवटच्या दिवशींच्या मूर्तींची संख्या लक्षात घेता  तसेच  धार्मिक भावना लक्षात घेऊन नियोजन करावे तर   विसर्जनाच्या नियोजनाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी उद्घोषणा आणि जाहिरात करण्याची सूचना केली.

spot_img
Latest news
Related news