Maharashtra Corona Update: राज्यात दिवसभरात बरे झाले 9,136 रुग्ण तर नवीन 14,718 रुग्णांची भर

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.46 टक्के

एमपीसी न्यूज : राज्यात आज (गुरुवार) 9136 रुग्ण बरे झाले तर 14 हजार 718 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.46 टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण 5 लाख 31 हजार 563 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 1 लाख 78 हजार 234 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले 14,718 नवीन रुग्ण आणि नोंद झालेले 355 मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा- 1350 (30), ठाणे- 238 (12), ठाणे मनपा- 183 (1), नवी मुंबई मनपा-405 (11), कल्याण डोंबिवली मनपा- 278, उल्हासनगर मनपा-21, भिवंडी निजामपूर मनपा- 16 (1), मीरा भाईंदर मनपा- 189 (6), पालघर-130 (2), वसई-विरार मनपा-176, रायगड-305 (13), पनवेल मनपा-214 (7)

नाशिक-219 (15), नाशिक मनपा- 740 (16), मालेगाव मनपा- 46 (1), अहमदनगर-347 (४),अहमदनगर मनपा- 257 (4), धुळे- 72, धुळे मनपा- 78 (1), जळगाव- 603 (7), जळगाव मनपा- 94 (3), नंदूरबार- 143 (3)

पुणे- 819 (12), पुणे मनपा- 1772 (35), पिंपरी चिंचवड मनपा-1085, सोलापूर-251 (14), सोलापूर मनपा- 56 (4), सातारा- 532 (2)

कोल्हापूर- 352 (22), कोल्हापूर मनपा- 151 (5), सांगली- 247 (11), सांगली मिरज कुपवाड मनपा- 276 (6), सिंधुदूर्ग-18, रत्नागिरी – 64,

औरंगाबाद – 135 (1),औरंगाबाद मनपा- 119 (5), जालना- 43 (4), हिंगोली- 59 (1), परभणी-48, परभणी मनपा-25, लातूर-85 (2), लातूर मनपा- 128 (1), उस्मानाबाद-49 (4),बीड-56 (2), नांदेड- 111(18), नांदेड मनपा- 182 (13),

अकोला-42 (2), अकोला मनपा-12, अमरावती-45, अमरावती मनपा-86 , यवतमाळ-117 (2), बुलढाणा- 67 (2), वाशिम-28, नागपूर-152 (2), नागपूर मनपा-1086 (34), वर्धा- 41 (3), भंडारा- 39 (4), गोंदिया-65, चंद्रपूर-74, चंद्रपूर मनपा-49, गडचिरोली-25, इतर राज्य 22 (3).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 38 लाख 62 हजार 184 नमुन्यांपैकी 7 लाख 33 हजार 568 नमुने पॉझिटिव्ह (18.99 टक्के) आले आहेत. राज्यात 13 लाख 24 हजार 232 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 641 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 355 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.2 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.