Ganeshotsav 2023 : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत दीड दिवसीय गणरायाला निरोप!

एमपीसी न्यूज – गाजतवाजत घरोघरी विराजमान (Ganeshotsav 2023 ) झालेल्या लाडक्या बाप्पाचे आज दीड दिवसानंतर आनंदमय वातावरणात ठिकठिकाणी विसर्जन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख विसर्जन घाटांसह पालिका व सामाजिक संघटनाच्या वतीने ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हौदात दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लहान मुलं,तरुण-तरुणींसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने विसर्जन स्थळी उपस्थित होते.

यावेळी लोकांच्या वतीने ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देण्यात आल्या. दीड दिवसीय गणरायाला निरोप देताना काही ठिकाणी नागरिक भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pune : केवळ उद्योजक म्हणून नाही तर देशासाठी एक कर्तव्य म्हणून उद्योग करावा – डॉ. मोहन भागवत

शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने (Ganeshotsav 2023 ) वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट या ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदात गणरायाचे विसर्जन करण्यास लोकांनी पसंती दर्शविली.

20, 21, 23, 25 आणि 28 सप्टेंबर या कालावधीत विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहेत. गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन देखील केले जात आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात असून नागरिकांकडून या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.