Ganeshotsav in Australia : ऑस्ट्रेलियामध्येही गणेशोत्सव उत्साहात

एमपीसी न्यूज : गणरायाचा उत्सव सातासमुद्रापारही साजरा केला जात आहे. युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या संस्थेच्या वतीने अ‍ॅडलेड शहरामध्ये ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ (Ganeshotsav in Australia) नावाने प्रचलित गणेश उत्सव उत्साहात साजरा होत आहे.

CM Eknath Shinde : शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद

हा उत्सव 2016 पासून साजरा होत असून या वर्षी लालबाग, मुंबई येथे बनवलेली 21 फूट उंच गणेश मूर्ती 45 दिवसांचा बोटीचा प्रवास करून अ‍ॅडलेडला पोहोचली. शनिवारी 3 सप्टेंबर रोजी महाआरतीचे आयोजन केले होते. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विशेषतः ढोल-ताशा या वाद्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रविवारी, 4 सप्टेंबर रोजी महाआरतीसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. याबाबतची माहिती कटकम राजन कुमार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.