Pune : अज्ञाताने गोडाऊनमधील पितळाचे 3 लाखांचे नळ नेले चोरून

एमपीसी न्यूज – गोडाऊनमधील पितळाचे 3 लाखांचे नळ चोरून नेल्याची  घटना 20 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दत्तनगर आंबेगाव रोड येथील रंगोली बाथ डिस्ट्रिब्युटर्सच्या गोडावून मध्ये घडली.

याप्रकरणी मनिषकुमार कंटेसरिया(वय 30, रा.नांदेड सिटी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिषकुमार कंटेसरिया यांचे रंगोली बाथ डिस्ट्रिब्युटर्सचे गोडावून कुलूप लावून बंद असताना गोडाऊनच्या उजव्या बाजूचा पत्रा कापून गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील 3 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचे क्रोम प्लेटेड पितळाचे नळ चोरून नेले.

याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.