Google : गूगल Bard AI आता मराठीत

एमपीसी न्यूज –  गूगलचे  संभाषणात्मक AI आता अधिक प्रभावी झाले आहे.कारण  आता  यात मराठीसह (Google)  हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांचाही  समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे  मराठी भाषेमध्ये तुम्ही AI सोबत बोलू शकता.गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी  हे संभाषणात्मक AI  अधिक प्रभावी केले आहे.

Chinchwad : खान्देश मराठा पाटील समाज संघाचा गुणगौरव समारंभ उत्साहात

Google Bard AI या चॅटबॉटकडून तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकता, कोणत्याही प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारु शकता. मिळालेली माहिती अर्धवट वाटली तर त्यावर आणखी प्रश्न विचारु शकता.

गुगलच्या चॅटबॉटला तुम्ही फोटो पाठवू शकता आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न देखील विचारु शकता.

गूगल बार्ड AI वापरण्यासाठी लिंक: https://bard.google.com/

गूगलच्या या चॅटबॉटकडून तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती मागू शकता आणि दुसऱ्या क्षणात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हा चॅटबॉट देतो.

गूगलच्या AI ने मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती, कन्नड, मल्याळम या भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे आणि हे वापरणं अगदी मोफत आहे.

ChatGPT ने सुद्धा अलीकडेच भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला हे, मात्र त्यासाठी काही शुल्क आकारण्यात येतात. तर गूगलकडून ही सेवा मोफत देण्यात आली आहे.

गूगल ट्रान्स्लेटरप्रमाणे गूगलच्या या AI मध्येही काही त्रुटी आढळू शकतात.AI द्वारे देण्यात आलेली माहिती कधी कधी चुकीची असू शकते, ही टीप गुगलकडून देण्यात येत आहे.

त्यामुळे विचार करुन मिळालेली माहिती आत्मसात केली पाहिजे. काही शंका वाटल्यास ती माहिती गुगलवर टाकून स्वतंत्रपणे सर्च केली पाहिजे.गूगल त्यांच्या AI वर अधिक काम करत आहेत.

त्यामुळे लवकरच या चुका सुधारल्या जातील ही (Google)अपेक्षा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.