Google : गुगल डुडल ही पाणीपुरीच्या प्रेमात… आज डुडलवर खेळा पाणीपुरी गेम

एमपीसी न्यूज – गोल गप्पा, पुचका, पाणी पुरी (Google) अशा विविध नावाने प्रसिद्ध असणाऱ्या पाणी पुरीचे आज (बुधवारी) सेलेब्रेशन केले आहे. त्यासाठी डुडलद्वारे युजर्ससाठी एक मजेशीर गेम तयार कऱण्य़ात आला आहे.

ज्यामध्ये विविध फ्लेवरच्या पाणी पुरी तुम्हाला ग्राहकांना द्यायच्या आहेत. आहे की नाही भन्नाट…?

Pune : ना हरकत प्रमाणपत्रासाठी 25 हजारांची लाच घेणाऱ्या मीटर रीडर लोकसेवकास अटक

या भन्नाट कल्पनेचे कारण ही भन्नाटच आहे. 2015 साली आजच्या दिवशी मध्य प्रदेशच्या इंदौर मध्ये एका पाणीपुरी विक्रेत्याने विश्वविक्रम केला होता.

त्याची आठवण म्हणून गूगलच्या होमपेजवर अ‍ॅनिमेटेड गेम उप्लब्ध करून देण्यात आला आहे.

गूगल डूडलने आज होम पेज वर भारतीयांचं आवडतं स्ट्रीट फूड पाणीपुरी सेलिब्रेट केलं आहे. पाणी पुरीला भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं आहेत.

यात पुरीमध्ये बटाटावाटाणेमूग सोबत तिखटगोड पाणी दिलं जातं.

भारतीय युजर्सना हा गेम जाम आवडला असून  उत्तम प्रतिसाद या गेमला मिळत आहे.

डुडलच्या एका छोट्या कृत्यामुळे भारतातील पाणीपुरी पूर्ण जगात फेमस झाली म्हणायला हरकत (Google) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.