Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध

एमपीसी न्यूज -यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार टिळक स्मारक ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला ( Pune )आहे.

पुणे शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नेत्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पत्र पाठवून विरोध केला आहे.

राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करत आहेत. देशात आणि परदेशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करत असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगत आहे.

Google : गुगल डुडल ही पाणीपुरीच्या प्रेमात… आज डुडलवर खेळा पाणीपुरी गेम

त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा, असं अरविंद शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे. डॉ. रोहित टिळक हे एन. एस. यु. आय. चे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर कसबा पेठ विधान सभेतून त्यांना दोन वेळा उमेदवारी दिली गेली होती.

आपले नेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या लोकशाही विरोधी विचारांना विरोध करीत आहेत.

देशात आणि परदेशामध्ये सुध्दा नरेंद्र मोदी हे लोकशाही विरूध्द कृत्य करीत असताना आपल्या काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी त्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांशी विसंगती असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार जाहिर करणे आणि  बोलवणं हे अत्यंत खेदजनक वाटत आहे.

त्याचा रोष संपूर्ण पुणे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणून आपल्या स्तरावर आपण डॉ. रोहित टिळक यांना समज द्यावी आणि कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला द्यावा, अशी विनंती अरविंद शिंदे यांनी नाना पटोलेंना केली ( Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.