Pune Unlock News : पुण्यात सकाळी आठ ते रात्री 10 वाजेपर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार राहणार सुरू, जाणून घ्या नवे नियम…

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार हे उद्यापासून (सोमवार) 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा आदेश आज रात्री महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केला आहे. नव्या नियमावलीनुसार आता सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार सुरू ठेवता येणार आहेत. 

हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार मालक व चालकांबरोबरच सर्व ग्राहकांनाही ही नियमावली माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जारी केलेली संपूर्ण नियमावली आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करीत आहोत.

1) पुणे महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे  5 ऑक्टोबर २०२० पासून 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील.
याकरिता पर्यटन विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना (SOP) चे पालन करणे बंधनकारक आहे.

2) पुणे महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार खालील अटी व शर्तीच्या आधारे सुरु राहतील.

  • महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटिल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट ब बार हे दिनांक 5 ऑक्टोबर 2020 पासून 50 % क्षमतेतुसार सुरु
    राहतील.
  • सदर आस्थापना या सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनींगद्वारे तपासणी करण्यात यावी.
  • कोविड -19 संदर्भात लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी खोकला या सारखी लक्षणे असलेल्या ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देवू नये. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने प्रत्येक ग्राहक/ग्रुपमधील एकाचे नाव, संपर्क क्र, ई-मेल आयडी, दिनांक, वेळ इ. माहितीच्या नोंदी दररोज ठेवण्यात याव्यात.
  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची ना हरकत घेण्यात यावी.
  • सदर आस्थापनांनी सेवा देताना किंवा प्रतीक्षालय येथे सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
  • ग्राहकांनी मास्क परिधान केले असेल तरच त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात यावा. ग्राहकांनी
    हॉटेलमध्ये व हॉटेलच्या परिसरात असताना मास्क परिधान करणे बंधनकारक आहे (खानपानाव्यतिरिक्त).
  • संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटाईजर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हॅन्ड सॅनिटाईजर ग्राहकांच्या वापराकरिता प्रतीक्षा कक्ष, प्रवेशद्वार ह. ठिकाणी ठेवण्यात यावे.
  • आस्थापना चालकांनी ग्राहकांना शक्‍यतो डिजिटल माध्यमाद्वारे पेमेंट करण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख स्वरुपात पेमेंट घेताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कॅशिअर यांनी त्यांचे हात सतत निर्जंतुक करावेत.
  • रेस्टरूम आणि हात धुण्याच्या जागा यांची वारंवार स्वच्छता करण्यात यावी व त्या जागा सॅनिटाईज कराव्यात.
  • काऊंटर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्‍यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन या सारखे बॅरीयर असावे. शक्‍य असल्यास प्रवेशासाठी व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.
  • शक्य असल्यास दारे, खिडक्या उघडी ठेवावीत व ए.सी.चा वापर टाळावा. ए.सी. वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे. शक्‍य असल्यास पोर्टेबल हाय एफिशियंसी एयर क्लीनर बसवावेत.
  • सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असावी. सी.सी.टीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.
  • व्हॅलेट पार्किंग उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्हज यांचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • डिस्पोजेबल मेनू कार्ड, क्‍यूआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहित मेनूकार्ड उपलब्ध करण्यात यावे. रीयुजेबल मेनू कार्ड ग्राहकांचे वापरानंतर निर्जंतुक करावे. डिस्पोजेबल मेनू कार्ड वापरानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.
  • कापडाच्या नॅपकिन ऐवजी चांगल्या प्रतीच्या डिस्पोजेबल पेपर नॅपकिन वापर करावा.
  • सदर आस्थापनांनी दोन टेबलमधील अंतर कमीत कमी एक मीटर असेल या प्रमाणे त्यांच्या रचनेमध्ये योग्य ते बदल करून घ्यावेत.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार बाह्य बाजू निर्जंतुक केलेली सीलबंद बाटलीतील पाणी अथवा फिल्टर केलेले पाणी ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे.
  • मेनूमध्ये फक्त शिजविलेल्या खाद्य पदार्थांचा समावेश करावा शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.
  • प्रत्येक ग्राहकांच्या वापरानंतर ग्राहक सर्विस एरियाचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • फर्निचर, टेबल, खुर्च्या, बुफे टेबल, काऊन्टर इ. जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • बुफे सेवेला परवानगी नाही.
  • शक्‍य असेल तेथे मेनूमध्ये प्री प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन द्यावे.
  • केवळ नेमून दिलेले कर्मचारी यांनीच संबंधित टेबल वर अन्न पदार्थ सर्व्ह करावे.
  • प्लेट्स,चमचे आदी सर्व सेवा उपकरणे गरम पाण्यात व मान्यता प्राप्त जंतूनाशकाने धुवावीत.
  • सेवा उपकरणे, वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपाटात ठेवावीत.
  • शक्य असल्यास सेवा उपकरणे व अन्न पदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वार्मर्स असावेत.
  • ग्राहकांनी वापरलेली प्लेट्स, चमचे, ग्लास इ. सेवा उपकरणे तातडीने धुण्यासाठी धुण्याच्या जागी न्यावीत. शिल्लक राहिलेले अभ्न हे संबंधित बकेट मध्ये जमा करावे तसेच दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावावी.
  • “ग्राहकांनी हॅन्ड सॅनिटाईजरचा वापर करावा, जेवणा व्यतिरिक्त मास्कचा वापर करावा” अशा प्रकारचे पोस्टर्स आस्थापनांचे प्रवेशद्वाराजवबळ लावावेत.
  • ऑनलाईन आउटलेट असणाऱ्या आस्थापनांनी आस्थापना सुरु असण्याच्या वेळा, मास्कचा वापर, खाद्यपदार्थची आगाऊ बुकिंग, आगाऊ पेमेंट, डिलिवरी इत्यादींबाबत असणारे नियम/ पॉलिसी यांची माहिती वेबसाईट, सोशल मिडिया इ. माध्यमातून प्रसिद्ध करावी.
  • करमणुकीचे लाईव्ह कार्यक्रम वेंडिंग व इतर गेम एरिया (including Billiards, darts & Video Games) इनडोर व आउटडोर कार्ड रूम्स यांना परवानगी नाही.
  • सर्व संबंधित आस्थापनानी त्यांच्या सर्व कर्मचा-यांची नियमित कोविड-19 चाचणी करावी. एन 95 किंवा त्याच दर्जाचा मास्क कर्मचा-यांनी वापरणे अनिवार्य आहे. आस्थापनावरील कर्मचा-यांनी त्यांचा गणवेश दररोज बदलणे अनिवार्य आहे. गणवेश व्यवस्तीत सॅनिटाईज करावा. दिवसातून २ वेळा परिसराचे  निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • सदर आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी आल्यावर थर्मल स्क्रिनिंग करावे. सर्व कर्मचा-यांनी त्यांच्या आरोग्याची स्वत: काळजी घ्यावी तसेच कोविड-19 संदर्भात काही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ कोविड-19 हेल्पलाईनवर वैद्यकीय उपचाराकरिता संपर्क साधावा.
  • ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्‍यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. ग्राहकांनी प्रतीक्षालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.
  • सदर आस्थापनांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने आवश्यक तेथे फरशीवर मार्किंग करून घ्याव्यात.
  • गर्दी टाळणेसाठी हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांच्या क्षमतेतुसार ग्राहकांना प्रवेश द्यावा.
  • सदर आस्थापना चालकांनी त्यांच्या कर्मचा-यांना कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वैयक्तिक स्वच्छता, खाद्यपदार्थ तयार करताना घ्यावयाची दक्षता, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इ.बाबत प्रशिक्षण द्यावे.
  • किचन एरिया वारंवार सॅनिटाईज करण्यात यावा.
  • सदर आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हज, शेफकॅप/ नेटकॅप, फेसशिल्ड अशा सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • सदर आस्थापनांनी HAACP/ISO/FSSAI यांचे स्वच्छता (Sanitization & Hygiene) बाबतचे निकष व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे.
  • सदर आस्थापनांनी त्याचेकडे जमा होणारा ओला, सुका, बायोडीग्रेडेबल इ. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. ग्लोव्हज, मास्क इ. चे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करावे.

3) हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार सुरु ठेवताना कोविड-19 प्रतिबंध उपाय योजना करण्याकरिता पर्यटन विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

4) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू न राहतील.

5) कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये दंडनीय अपराध केला, असे समजून कारवाईस पात्र राहील.

6) सदर आदेश दि. 05 ऑक्टोबर 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.