Pimpri : व्यायामशाळेचे सेवाशुल्क वितरण बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे व्यायाम शाळा चालविणा-यांना देण्यात येणारे सेवा शुल्क बंद करण्यात आले आहे.  यामुळे महापालिकेची दरवर्षी 20 लाख रूपयांची बचत होणार असून वीज बिल संबंधित मंडळांतर्फे दरमहा भरले जाणार आहे.

महापालिकेच्या शहरात एकूण 82 व्यायामशाळा आहे. त्या सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठान आणि संस्थांना दरमहा 2 हजार रूपये सेवाशुल्क तत्वावर देण्यात येतात. तसेच, पालिका व्यायामशाळेसाठी साहित्य पुरविले जाते. अनेक मंडळे व संस्था व्यायामशाळा व्यवस्थितपणे चालवित नाहीत. काही व्यायामशाळा बंदच असतात. अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य चोरीला गेले आहे. व्यायामशाळाची दुरावस्था झाली आहे. संबंधितांकडून वीजेचे बिल दरमहा भरले जात नाही.

या प्रकाराच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन त्या मंडळांना दरमहा सेवाशुल्क देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना दरमहा वीज बिल भरून ते क्रीडा विभागात सादर करणे सक्तीचे केले आहे. या निर्णयामुळे पालिकेची दरमहा तब्बल 20 लाख रूपयांची बचत होईल, असे अपेक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.