Hadapsar : दुचाकीच्या जोरदार धडकेत ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू ; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – दुचाकीच्या जोरदार धडकेत जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 26) दुपारी 3 सुमारास सूर्यमुखी गणपती मंदिराच्या बाजूला ससाणे नगर हडपसर येथे झाला होता.

चंद्रकांत लक्ष्मण कदम (वय 57 रा.ससाणेनगर ,हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश चंद्रकांत कदम यांनी फिर्याद दिली आहे. जमाल फैजुद्दीन शेख (वय 25 रा. काळेपडळ हिंगणेमळा, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश कदम यांचे वडील चंद्रकांत कदम काही कामासाठी बाहेर गेले असता सय्यदनगर कडून हडपसरच्या दिशेने स्कुटीवर जाणाऱ्या जमाल शेख याने त्याची दुचाकी ही भरधाव वेगात चालवून चंद्रकांत यांना जोरदार धडक दिली. यामध्ये चंद्रकांत कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल दुपारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी जमाल शेख याला अटक केली असून पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.