Wakad : महिलेच्या डेबिट कार्डवरून परस्पर पावणेदोन लाखांची ऑनलाईन खरेदी

एमपीसी न्यूज – महिलेच्या डेबिट कार्डवरून एकाने परस्पर 1 लाख 77 हजार 52 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.

अस्मिता अभिजित दाणी (वय 42, रा. द वूड्स सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सॅम्यूल ॲनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अस्मिता यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती आरोपीने मिळवली. त्याद्वारे आरोपीने त्यांच्या बँक डेबिट कार्डद्वारे जबाँग या वेबसाईट वरून 1 लाख 77 हजार 52 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अस्मिता यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती कशी मिळवली याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.