Pimpri: महापालिकेतील संतोषी चोरघे यांची समाजसेवक पदाची सेवा संपुष्टात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘क’ मधील समाजसेवक संतोषी सुदाम चोरघे यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना समाजसेवक पदावरुन महापालिका सेवेतून काढण्यात आले आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना काढला आहे.

महापालिकेत समाजसेवक पदावर संतोषी चोरघे कार्यरत होत्या. त्या  कोळी जातीच्या असून अनुसुचित जमाती प्रवर्गातून त्यांना समाजसेवक या आरक्षित पदावर नियुक्ती देण्यात आली होती. नियुक्ती आदेशापासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून करुन घेवून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, चोरघे यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार संधी देवूनही मुदतीनंतर अद्यापपर्यंत त्या प्रमाणपत्र सादर करु शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आलेली होती.

खातेनिहाय चौकशी समितीत नमुद दोषारोप सिध्द झालेले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. चोरघे यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक नाही.  समाजसेवक चोरघे यांचे गैरवर्तन प्रकरणी खातेनिहाय चौकशीत दोषारोप व नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीनुसार भंग केलेला आहे. त्यामुळे चोरघे यांना 27 डिसेंबर 2018 पासून महापालिका सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.