Hadapsar : लग्नाच्या वरातीत नाचत असताना धक्का लागल्याने कोयत्याने वार; 1 गंभीर

एमपीसी न्यूज : लग्नाच्या वरातीत नाचत (Hadapsar) असताना धक्का लागल्याने झालेल्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हडपसर परिसरातील गांधी चौकातील कामगार नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर विलास सुकळे (वय 19) आणि अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अमरदीप भालचंद्र जाधव (वय 19) या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 30 डिसेंबर रोजी एका लग्नामध्ये नाचत असताना दोघांमध्ये भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने 15 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीवर कोयत्याने वार केले.

Pune Crime : दोघांवर एकीचं प्रेम, दोघांनी मिळून केला तिचा गेम

फिर्यादीसोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादीला (Hadapsar) लाकडी बांबू आणि हॉकी स्टिकने मारून गंभीर जखमी केले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.