Wakad : पतीच्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – पतीचे एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 30 जून 2010 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत वाकड येथे घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने शुक्रवारी (दि. 28) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अपूर्व राजेश श्रोत्री (वय 41), सासू लता राजेश श्रोत्री (वय 60, दोघेही रा. शंकर कलाटे नगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संबंधास फिर्यादी यांनी विरोध केला. या कारणावरून पतीने विवाहितेला मारहाण केली. याबाबत विवाहितेने सासूला हा प्रकार सांगितला असता सासूने देखील वारंवार शिवीगाळ करून विवाहितेचा शाररिक मानसिक छळ केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.