Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत 27 रोजी सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

एमपीसी न्यूज – पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी देण्याबाबत आदेत देण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पुढील सुनावणीत सर्वोच्च न्यायालय महत्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी गेल्या दोन महिन्यांपासून लांबली आहे. मंगळवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज हे प्रकरण घटनापीठासमोर आले. न्या.चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी द्यावी, जेणेकरुन निवडणूक आयोग पक्षाच्या निवटणूक चिन्हाबाबत निर्णय घेईल. त्यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंवर रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. या सुनावणीत पक्षकारांचे म्हणणे एकले जाणार असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.