Crime News : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या किरकोळ भांडणातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली आहे. ही घटना दिघी येथे सोमवारी (दि.5)  रात्री पावणेदहा वाजता घडली.या टोळक्यातील चार आरोपींना दिघी पोलिसांनी अटक केली आहे.

राहूल हरिभाऊ अंधारे (वय 19 रा.दिघी गावठाण) यांनी फिर्याद दिली असून दिघी पोलिसांनी योगेश सुरेश जोगे (वय 19), अमित अंकुश इंगवले (वय 22),सोहेल अलिशीयर मिर्झा (वय 19),ताकीर हुसेन आषिश चिंतापरम (वय 18) सर्वजण राहणार दिघी यांना अटक केली असून दोन जण अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचा मित्र रोहीत जाधव याला आधी कोणी तरी मारहाण केली होती. याचच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली.तसेच फिर्यादीच्या नाकावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करत परिसरात दहशत माजवली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.