Hindi Mahasankalp Sabha : कालची सभा कौरवांची आजची पांडवांची; देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : आज मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Hindi Mahasankalp Sabha) यांची उत्तर प्रदेश हिंदी भाषी महासंकल्प सभा सुरू आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घनघणाती प्रहार केला आहे. त्यांनी विकासापासून काल झालेल्या औरंगाबाद सभेपर्यंत सर्व मुद्दे मांडले आहेत.

Ketki chitle : कुणाच्याही वडिलांबद्दल मरावं असं कोणी बोलतं का? – सुप्रिया सुळे

आजची सभा पांडवांची 

कालच्या सभेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की  संजय राऊत बोलत होते सभेची बाप सभा असणार आहे. आणि कालच्या सभेत संख्या जास्त होती. पण, ज्यांची संख्या जास्त ते कौरव आणि ज्यांची संख्या कमी ते पांडव. म्हणून काल कौरवांची सभा झाली आज पांडवांची सभा (Hindi Mahasankalp Sabha) सुरू आहे. कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा होती. भाषणात नवे मुद्दे येतील अशी आशा होती. परंतु शेवटपर्यंत लाफ्टर सभा होती.

हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह – 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की बाळासाहेबांच्या मुलाच्या काळात हनुमान चालीसा म्हणणे राजद्रोह झाला आहे. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे हा राजशिष्टाचार आहे.

तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू?

रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही नव्हता, मी होतो मग तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू? उद्धवजी तुम्ही 1992 साली नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकिल झालो आणि डिसेंबरला हा नगरसेवक वकिल देवेंद्र फडणवीस बाबरी पाडण्यासाठी गेलो होता, याचा मला अभिमान आहे. मी हॉटेलमध्ये गेलो नव्हतो, सहलीला नव्हते गेलो, बाबरी पाडायला गेलो होतो.

बाळासाहेब ठाकरे तर शरद पवारांना मैदाचे पोते म्हणायचे

बाबरीच्या आंदोलनात माझे वजन 128 होते, आता 102 आहे. तुम्ही पाठीत खंजीर खुपसून माझे वजन कमी करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे तर शरद पवारांना मैदाचे पोते म्हणायचे. त्याच मैदाच्या पोत्याच्या पाय पकडून तुम्ही सत्तेत आलात. वजनदार माणसाच्या नादी लागू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.