Pune News : हडपसर येथे रविवारी भरणार हिंदु राष्ट्र जागृती सभा – पराग गोखले

एमपीसी न्यूज  – हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने (Pune News) येत्या रविवारी म्हणजे 1 जानेवारी 2023 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान,काळे पडळ, हडपसर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव,अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि चिंतामणी प्रासादिक दिंडीचे खजिनदार ह.भ.प. दत्तात्रय तुकाराम चोरघे, भाजप पुणे कसबा मतदारसंघाच्या सरचिटणीस अ‍‍ॅड राणी सोनावणे, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच केडगावचे अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर हेही उपस्थित होते,

या सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री सुनील घनवट, अधिवक्ता निलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच या सभेत सनातन संस्थेच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आदी उपस्थित रोहणार आहेत, अशी माहिती पराग गोखले यांनी दिली.

MPC News Podcast 30 December 2022 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या सभेच्या ठिकाणी राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या संदर्भात तसेच क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक;यांसह हिंदूंना प्रतिदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच हिंदु जागृती करणार्‍या, हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

आतापर्यंत सभेसाठी 50 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला असून विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या 150 हून अधिक बैठका घेण्यात आल्या आहेत. 4500 पेक्षा अधिक जणांनी या बैठकांचा लाभ घेतला. सामाजिक संकेतस्थळ, हस्तपत्रके, होर्डिंग, (Pune News) फलकलेखन अशा विविध माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. या सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, तसेच सभेत सहभागी होण्यासाठी 8983335517 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.

सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 31 डिसेंबर या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरीचा मार्ग पुढील प्रमाणे – पुरोहित स्वीट्स – ससाणेनगर – काळेबोराटे नगर रस्ता – जनसेवा बँक कॉलनी – तुकाई टेकडी चौक – कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान येथे समारोप होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.