Hinjavadi Crime News : … म्हणून त्याने तरुणाला दगडाने मारले

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने तरुणाला रुमालात दगड बांधून मारले. यामध्ये तरुणाला गंभीर ईजा झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास जयराम नगर, हिंजवडी येथे घडली.

अक्षय लालचंद ठोकळे (वय 24, रा. जयरामनगर, हिंजवडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लखन छगन जाधव (रा. साखरेवस्ती, हिंजवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन त्याच्या पत्नीसोबत फिर्यादी यांच्या घरासमोरून उभा राहून भांडण करत होता. त्यामुळे फिर्यादी अक्षय यांनी आरोपीला आमच्या घरासमोर भांडण करू नका, इथून निघून जा, असे सांगितले.

त्या कारणावरून आरोपी लखन याने रुमालात दगड बांधून अक्षय यांना मारहाण केली. यात अक्षय यांच्या डाव्या खांद्याला मुकामार लागला. तर डाव्या कानास खरचटले. अक्षय यांच्या कपाळावर जखम होऊन चार टाके पडले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.