Hinjawadi : जागेवर कब्जा करून तिघांनी केला जातीवाचक अपमान

एमपीसी न्यूज : अनुसूचित जातीवरून (Hinjawadi) अपमान करत तीन जणांनी जागा हडपून त्यातून पैसे कमवत असल्याचा प्रकार सुतारवाडीमध्ये घडला. तिन्ही आरोपी जागेवर अतिक्रमण करून संबंधित जागा मालकाचा वारंवार अपमान करत असल्याची घटना घडली आहे.

शैलेंद्र सोनकर (वय 42 वर्षे, रा. पिंपरी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कालिदास कोकाटे, नारायण कोकाटे, शिवाजी कोकाटे (सर्व रा. पाषाण) यांच्या विरोधात भा. द. वि कलम 447, 506, 34 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(i)f, 3(1)(i)s अन्वये हिंजवडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News: गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास आता मुदतवाढ नाही

सुमारे तीन ते चार वर्षांपासून फिर्यादी यांच्या मालकीच्या सर्वे नं 29/8/1 मौजे सुतारवाडी पाषाण येथील 7 गुंठे जागेवर तीन आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीतून त्यांना हाकलून दिले. त्यांच्या इच्छेविरुद्ध परवानगी शिवाय स्वतःचा हक्क दाखवून अतिक्रमण केले. त्या ठिकाणी ओकवूड नावाचे फर्निचरचे दुकान भाड्याने देऊन त्याचे लाखो रुपयांचे भाडे घेत आहेत.

फिर्यादीच्या मालकी हक्कास (Hinjawadi) नकार देऊन ओकवूड दुकानाच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये आम्ही पाषाण गावातील स्थानिक रहिवासी असून या ठिकाणी परत आलास तर तुझे हातपाय मोडून टाकू. तसेच जातीवरून अपमान करून जागा ताब्यात देण्यास नकार देऊन त्यावर अतिक्रमण करून फिर्यादी अनुसूचित जातीचे असल्याचे माहित असताना त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेऊन त्यांच्यावर अन्याय करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.