Hinjawadi Crime : बनावट चवीच्या साहाय्याने घर उघडून सव्वाचार लाखांचे दागिने, रोकड पळवली

एमपीसी न्यूज – संपूर्ण कुटुंब दापोली येथे फिरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या साहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून तीन लाख 95 हजार 630 रुपयांचे दागिने आणि 25 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजता भूमकर वस्ती, वाकड येथे घडली.

विष्णू तुकाराम कानगुडे (वय 46, रा. भूमकरवाडी, वाकड) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कानगुडे त्यांच्या कुटुंबासोबत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वासात वाजता फिरण्यासाठी दापोली येथे गेले. कानगुडे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता परत घरी आले. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने कानगुडे यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.

घरातील लाकडी कपाटाच्या लॉकर मधून चोरट्यांनी तीन लाख 95 हजार 630 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 25 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण चार लाख 20 हजार 630 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.