Hinjawadi Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी उद्योजक नाना गायकवाड यांच्या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्यात आला. याप्रकरणी उद्योजक नाना गायकवाड यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2017 ते 16 जून 2021 या कालावधीत सूस येथे घडली.

केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (वय 36, रा. आयटीआय रोड, औंध, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय वसंत कुलकर्णी (वय 58, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी बुधवारी (दि. 16) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांची ट्रिनिटी रियालिटी फर्म नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या मालकीची सूस येथे 60 गुंठे जमिनी आहे. ही जमिन बळकाविण्याच्या उद्देशाने आरोपी गणेश गायकवाड याने जबरदस्तीने जागेमध्ये घुसखोरी करून ताबा घेतला.

या जागेमध्ये पत्र्याचे शेड व कुंपण करून फिर्यादी कुलकर्णी यांना आपल्याच जागेत येण्यास आडकाठी घातली. तसेच मोजणी नकाशामध्ये फेरफार करून फिर्यादी यांच्या जागेतील उत्तरेकडील बाजू तुटक दाखविली आहे. तसेच बनावट नकाशा जबाबासोबत पोलिसांकडे सादर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.