Hinjawadi Crime News : क्लाउड नाईन ओयो लॉजवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो रूम्स लॉजवर छापा मारून कारवाई केली. या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश करत दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 18) रात्री करण्यात आली.

लखन उर्फ सनी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), मंगेश मनोहर सूर्यवंशी (वय 25, रा. आनंतानगर, क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर, हिंजवडी. मूळ रा. उदगीर, जि. लातूर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतानगर हिंजवडी येथील क्लाउड नाईन अपार्टमेंट्स ओयो लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा मारला.

आरोपी मंगेश याने लखन यांच्याकडून वेश्या व्यवसायासाठी दोन महिलांना प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून त्यावर त्याने आपली उपजीविका भागवली. पोलिसांनी मंगेश सूर्यवंशी याला अटक केली आहे. दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.