Hinjawadi : राजीनामा दिल्यावरून कंपनीतील वरिष्ठांकडून जातीवाचक बोलणी; तिघांविरोधात ॲट्रॉसिटी

एमपीसी न्यूज – गाड्यांच्या विक्रीमधील बोनस न दिल्याने कंपनीतील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरून त्याच्या तीन वरिष्ठांनी त्याला जातीवाचक बोलणी केली. यावरून तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर येथील कॉनकोर्ड मोटर्स इंडिया लिमिटेड येथे 30 मे रोजी घडली.

विशाल अंकुश म्हस्के (वय 36, रा. औंध) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विक्रम गुळवणी, सारा श्रीपाद, दीपक रावोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल म्हस्के हे बाणेर येथील कॉनकोर्ड मोटर्स इंडिया लिमिटेड येथे सीनियर कस्टमर ॲडव्हायझर पदावर नोकरी करतात. कंपनीने ठरवल्याप्रमाणे गाड्यांच्या विक्रीमधील बोनस विशाल यांना दिला नाही. तसेच प्रवासाची बिले देखील दिली नाहीत. त्यामुळे विशाल यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यावरून कंपनीचे सीईओ विक्रम गुळवणी, एचआर सारा श्रीपाद आणि जनरल मॅनेजर दीपक रावोत यांनी विशाल यांना बोलावून घेतले.

सीईओच्या सांगण्यावरून अन्य दोघांनी विशाल यांना जातीवाचक बोलणी सुनावली. याबाबत विशाल यांनी तिघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.