Hinjawadi : विदेश टूरच्या नावाने लाखोंची फसवणूक

एमपीसी न्यूज- परदेश टूरच्या नावाने एका हॉलिडे कंपनीने अनेक नागरिकांना लाखोंचा गंडा घातला. या प्रकरणी सोमवारी (दि.८) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी ग्लोबल कनेक्ट हॉलिडेज क्लब कंपनीचे संचालक विक्रांत मनहास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक योगेश पांडे (वय २७, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी मनहास याने २०१५ मध्ये बावधन येथे ग्लोबल कनेक्ट हॉलिडेज क्लब नावाने कंपनी स्थापन केली. स्वस्तामध्ये विदेश टूरचे नियोजन करून देतो अशी बतावणी करून अनेकांकडून लाखो रुपये घेतले. त्यानंतर कोणालाही परदेशात न पाठवता कंपनी बंद करून फसवणूक केली. या प्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांची ६ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणी अनेक तक्रारदार पुढे येत असून फसवणूक झालेल्यांचा आकडा मोठा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.